सीन १
एक बाइकवाला सरळरेषेत चाललाय. उजवीकडून एक स्पिरीटवाला येतो. ओव्हरटेक करतो. अन लगेच डावीकडे घुसून बाईकवाल्याला कट मारतो. बाइक चिपकते.
बिचारा बाइकवाला शिव्या खातो. कारण बाईकवाले नेहमीच वाइट्ट असतात न.
(टिळक रोड, पुणे)
सीन २
एक स्पिरीटवाला डावीकडे घुसत घुसत पुढे सरकतो. सिग्नलवरून सगळ्यात आधी पुढे जायचं न. शेवटी एका बसला चिपकतो.
मरता मरता वाचतो! PMT वाला वाचला, पब्लिकनी धुतला नाही त्याला.
(फातिमानगर चौक, पुणे)
सीन ३
एक वृद्ध दाम्पत्य रस्ता ओलांडतय. हळू चालताहेत. तेवढ्यात सिग्नल बदलतो अन एक कारवाला सुसाट निघतो अन जोऱ्यात होर्न देतो. ते थांबले कार गेली ते ही क्रॉसकरून गेले.
(लालबहादुर शास्त्री रोड, पुणे)
इतके अनुभव अवघ्या २ तासात ते ही सकाळी १० च्या आधी, सकाळी सदाशिवपेठेत गेलो होतो तेव्हा.
BRTS मधून बिनधास्त बाइक्स, कार्स घुसतात काय (?) लोक मोबाईलवरून बोलत रस्ता ओलांडतात काय, पब्लिक पूर्ण डावीकडून आडवी उजवीकडे काय घुसते ई. ई. अरे काय चाललाय काय? मामा असतांनाच सिग्नल पाळायचा का? बर हे करणार कोण? तर आपण पांढरपेशे ९ - ७ नोकरीवाले. त्यातल्या त्यात हल्ली (मगर) पट्टयात राहाण असल्यान IT वालेच जास्त दिसतात. सुशिक्षित लोकच असा वागताहेत तर काय होणार? अन हो, सध्या अर्धवट अमेरिकनांचा सावळा गोंधळ फुकटात बघायचा असेल तर रोज सकाळी १० - ११ वाजता अन संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान मगरपट्ट्याच्या गेट्सवर उभा रहाव. अगदी फुकट करमणूक होईल. मोठमोठ्या गाड्या एकेका माणसाला घेऊन घासत घासत जात असतात. अरे २ ३ किलोमीटरवर राहतात अन कार घेऊन येता? बर येता तर या, किमान २ ३ जनांना तर आणा सोबत? (Carpooling - श्या Its so below standard). मान्य आहे कि आपण डीझेल पेट्रोल विकत घेऊ शकतो पण म्हणून कसाही खर्चायच? आधीच तेलाच्या प्रेमापायी रूपयानी छप्पनि गाठलीय. (अर्रे चुकलो चुकलो $ वाढला की चांदी होते न भाव)
पायी चालणारे जीव मुठीत ठेऊन चालतात! रस्ता क्रॉस करण म्हणजे आफत असते राव ह्या २ तासात. अन फुटपाथ राहिला कोठेय, अर्धा फूटपाथ विक्रेत्यांचा अन हल्ली उरलेला बाईकवाल्यांचा असा हिशोब झालय.
अर्थात तसेही पायी चालणाऱ्यांना बाइकवाले अन कारवाले किती भाव देतात हे आजकाल पायी चालतांना मी अनुभवतोच. LBSवर मी कारमागे होतो. त्या दोघां आज्जी आजोबांचे भाव अन डोळे फार काही सांगून गेलेत, थबकायला झालं पण मला मात्र मागच्या कारवाल्यांनी जागवला.
हे थोड्याफार फरकानी नेहेमीच दिसत. पण तिसऱ्या सीननी फारच वाईट वाटलं म्हणून जरा लिहावस वाटतय बास. उद्या सकाळपासून पुनश्च हरिऒम! असो ट्राफीकबाबत भरपूर लिहून झालाय लोकांच, आता आपलीपण भर : D
~
अनिरुद्ध
एप्रिल १६, २०१३.
Hi Punekaranch Punyayee....
ReplyDelete