Remembering Savarkar! Celebrating 100 years for poem सागरास... ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उध्दरणी । मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या भुलविणें व्यर्थं हें आता । रे बहु जिवलग गमतें चित्ता । रे तुज सरित्पते । जी सरिता । रे तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी तरि आंग्लभूमी-भयभीता । रे अबला न माझिही माता । रे कथिल हें अगस्तिस आता । रे जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला |
Friday, December 11, 2009
सागरास...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment