Friday, December 11, 2009

सागरास...


Remembering Savarkar! Celebrating 100 years for poem

सागरास...

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा
, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू

तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें

मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन

विश्वसलो या तव वचनी । मी

जगदनुभव-योगे बनुनी ।
मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी

येइन त्वरें कथुन
सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा
हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु
यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें ।
कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा
व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे

नवकुसुमयुता त्या सुलता । रे

तो बाल गुलाबही आता
। रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा
, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा

प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य
, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे

बहु
जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे

तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा
, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी

तरि आंग्लभूमी-भयभीता । रे

अबला न माझिही माता ।
रे
कथिल हें अगस्तिस आता । रे

जो आचमनी एक पळीं
तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला